Ad will apear here
Next
वाट संघर्षाची
समाजात राहणाऱ्या प्रत्येकाची, कुटुंबाची व अगदी समाजाची गोष्टही वेगळी असते. त्यातही शहरी व ग्रामीण भागातील परिस्थिती भिन्न असल्याने त्यांची कथाही वेगळी असते. अशा २१ कथांचा गुच्छ सुधा सहस्रबुद्धे यांनी ‘वाट संघर्षाची’ या पुस्तकातून सादर केला आहे. कथांमध्ये कधी ग्रामीण, तर कधी शहरी वातावरण दिसले, तरी याचा समान धागा समाजाविषयीच्या कळकळीचा आहे. प्रेमकथा, कुटुंबकथांच्या परिघाबाहेर जाऊन व्यक्त केलेली सामाजिक वेदना यातून दिसते. काही कथांमध्ये या वेदनेवर फुंकर घालण्याचा उपाय शोधलेला दिसतो. ग्रामीण भागात महिलांना घोटभर पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, हातावर पोट असणाऱ्यांना पावसामुळे करावे लागणारे दिव्य, निःस्वार्थ सेवेत आप्तस्वकीयांनी अडथळे निर्माण केल्यावर ‘संघर्षाच्या वाटेवर’ चालून ठाम निर्णय घेणारी गोदावरी, मानवतेच्या दृष्टिकोनातून परक्या व पोरत्या बाळाचा ‘स्वीकार’ करणारी माता, शेतकरी व जवान पुत्राची समाजाकडून होणारी उपेक्षा, व्यथा मांडणारी वीरमाता अशी माणसांची विविध रूपे यातून दिसतात.

पुस्तक : वाट संघर्षाची
लेखिका : सुधा सहस्रबुद्धे
प्रकाशन : नीहारा प्रकाशन
पृष्ठे : १६०
मूल्य : २०० रुपये

(‘वाट संघर्षाची’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून  खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZVECD
Similar Posts
अभियंता दाम्पत्याच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन पुणे : ‘हल्लीचा वाचकवर्ग कवितांपासून दुरावला आहे. या वर्गाला पुन्हा कवितेकडे वळवण्याचे काम ‘तुझा मोहोर मखमली’ हा कवितासंग्रह करील,’ असा विश्वास डॉ. कैलास कमोद यांनी व्यक्त केला. अभियंता असलेल्या उपेंद्र आणि शर्मिला कुलकर्णी या दाम्पत्याच्या कवितांच्या ‘तुझा मोहोर मखमली’ हा काव्यसंग्रह नुकताच पुण्यात प्रकाशित झाला
ही व्यवस्था काय आहे? गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषयांवर राजीव कालेलकर यांनी केलेले विचारप्रवृत्त करणारे हे लेखन. या पुस्तकातील लेखांमध्ये अपंगत्व, दलित, स्त्रीप्रश्न, मैत्री, संगीत, मार्क्सवाद, संस्कृती इत्यादींवर भाष्य केले आहे.
एन to पी : नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन रुग्णांच्यादृष्टीने डॉक्टर देव असतात; पण त्यांच्याही आयुष्यात सर्वसामान्यांप्रमाणे सुख-दुःख, ताण-तणाव, आनंदाचे, संकटाचे किंवा आर्थिक अडचणींचे प्रसंग येत असतात. अशा प्रसंगांना डॉ. सोपान चौगुले यांनी ‘एन to पी (नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन)’ या पुस्तकातून शब्दरूप दिले आहे.
अनामिका एक - रूपे अनेक ‘अनामिका एक - रूपे अनेक’ या कथासंग्रहाचा परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language